सांगली : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये स्पर्धा, प्रभात फेऱ्या आणि विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे मुख्य समागम होणार असून, त्याआधी सांगली जिल्ह्यात व्यापक प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध, वक्तृत्व, चित्रकला व गीत गायन स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास समजावा, यासाठी माहितीपट व गीतांचे सादरीकरण करण्यासही सांगण्यात आले.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी तसेच सिख आणि सिंधी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिवहन विभागाने खारघर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी वाहन व्यवस्थेचा विचार करावा, अशीही सूचना देण्यात आली.
कोण होते गुरु तेग बहादूर?
गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे नववे गुरु होते. धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सांगलीत प्रभात फेरी, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटल प्रचार रथ, तसेच समाजस्तरावर बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध समाजघटकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन गुरु तेग बहादूर यांच्या इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्याकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: 28 फेब्रुवारीपर्यंत कामांचे आदेश न दिल्यास कारवाई? सांगलीत निधी खर्चासाठी पालकमंत्र्यांचा अल्टिमेटम.
- Gold Rate Today: धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात नरमाई; खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे २२K आणि २४K चे ताजे दर (२८ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: हप्ते बंद झालेल्या महिलांना ₹४०,००० मिळणार? इन्स्टाग्रामवरील ‘त्या’ व्हायरल दाव्याचे सत्य समोर; शासनाने जारी केला सतर्कतेचा इशारा
- Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ३०४ तालुक्यांतील दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये थेट खात्यात; राज्य सरकारचा ७,५०० कोटींचा निर्णय, GR जारी
- Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळाचे थैमान; गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार का?
- ST Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! शासनाकडून ₹३९१ कोटींचा निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार पगार?
- Gold Price Prediction 2036: येत्या दशकात सोन्याचा भाव कुठे पोहोचेल? जुन्या आकडेवारीवर आधारित गणित काय सांगतय, वाचा सविस्तर









