सांगली : जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे करण्यात आले आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार, महिलांच्या वैयक्तिक तक्रारी, शासकीय योजनांबाबतच्या अडचणी, घरगुती हिंसाचार, निवारा, अनुदान, शासकीय लाभ प्रलंबित असणे अशा विविध प्रश्नांवर संबंधित विभागांकडून थेट मार्गदर्शन व कार्यवाहीसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
महिला लोकशाही दिन म्हणजे काय?
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय तर चौथ्या सोमवारी तालुका स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. यामध्ये समस्याग्रस्त व पीडित महिलांना प्रशासनासमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहून अर्ज स्वीकारतात व तक्रारींची नोंद घेतात.
कोणत्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत?
न्यायालयीन प्रक्रियेत असलेली प्रकरणे, सेवा/नोकरी संदर्भातील बाबी आणि सामूहिक स्वरूपातील तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महिलांनी आपल्या समस्या लेखी अर्जासह मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी केले आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










