सांगली : जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायतीने ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केवळ पुरस्कारापुरतेच हे यश मर्यादित नसून, गावपातळीवर डिजिटल प्रशासनाचा प्रत्यक्ष परिणाम कसा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून कडेपूर मॉडेल चर्चेत आले आहे.
ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार सध्या 1,355 पेक्षा अधिक सेवा ग्रामस्थांसाठी पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 4,321 लाभार्थ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. डिजिटल व्यवहारांमुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात 21 टक्क्यांची वाढ झाली आले.
सरकारी कार्यालयात जाण्याची गरज कमी
शासकीय दाखले, प्रमाणपत्रे, कर भरणे, अर्ज प्रक्रिया अशा अनेक सेवांसाठी नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता या सेवा 24×7 ऑनलाइन उपलब्ध असल्याने गावकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचत आहे.
AI, ब्लॉकचेन आणि GIS चा वापर
ग्रामपंचायतीत बैठकींचा सारांश तयार करणे, योजना पात्रता शोधणे, डेटा विश्लेषण आदींसाठी AI चा वापर करण्यात येत आहे. तसेच नोंदींच्या सुरक्षिततेसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
GIS मॅपिंगद्वारे 309 नव्या घरांची नोंद करण्यात आली असून सुमारे 7 लाख रुपयांचा अतिरिक्त कर महसूल मिळाल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. तसेच तक्रार निवारण प्रणालीअंतर्गत 1,736 तक्रारी 100 टक्के वेळेत निकाली काढल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
डिजिटल प्रशिक्षणावर भर
डिजिटल सेवा सर्वांसाठी सुलभ व्हाव्यात यासाठी गावात डिजिटल प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांना डिजिटल प्रक्रियेचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील इतर गावांसाठी आदर्श
ग्रामीण भागात डिजिटल सुविधा प्रभावीपणे राबवल्यास पारदर्शकता, महसूल वाढ आणि सेवा सुलभता साध्य होऊ शकते, असे कडेपूरच्या उदाहरणातून दिसून येत आहे. हा मॉडेल जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींमध्ये कितपत राबवला जाऊ शकतो, याकडे आता ईतर गावांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगलीत नवे अग्निशमन केंद्र कार्यान्वित; ८ आयुष्यमान आरोग्य मंदिरे सुरू.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










