सांगली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून सांगलीत राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हा युनिटतर्फे काँग्रेस भवनसमोर आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सपकाळ यांनी संबंधित वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी आणि पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील विधान अयोग्य असल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या भावनांचा मुद्दा उपस्थित केला.
दरम्यान, 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अधिक संवेदनशील ठरत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.
या वेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही सोशल मीडियावर आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. “शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही,” असे म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर जिल्ह्यात या प्रकरणाची राजकीय चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
काँग्रेसकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
हेही वाचा: 76 लाख टन ऊस गाळपानंतर सांगलीतील साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात; फेब्रुवारीअखेरीस कारखाने बंद होणार.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










