सांगली : सांगली आणि मिरज शहरातील ‘डार्क स्पॉट’वर नशा आणि मद्यपान करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी शनिवारी रात्री संयुक्त कारवाई करत एकूण 75 जणांवर दंडात्मक कारवाई केली. सांगली उपविभागात 25 तर मिरज उपविभागात 50 जणांवर कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांत नशेतून मारामारी, खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सांगलीतील लिमये मळा परिसरातील घटनेनंतर नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली होती.
सांगली शहर, विश्रामबाग आणि संजयनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या विविध ठिकाणी 25 जणांवर कारवाई करण्यात आली. तर मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात 50 जणांवर कारवाई झाली.
या कारवाईत पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली 100 हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
सार्वजनिक ठिकाणी नशा किंवा मद्यपान करताना आढळल्यास यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा: शिवरायांच्या संदर्भातील वक्तव्यावरून सांगलीत राजकीय तापमान वाढले; काँग्रेस भवनसमोर भाजपचा निषेध.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










