सांगली : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध तालुक्यांत रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर पात्रता असलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे संधी मिळणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आयटीआयच्या समन्वयातून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संबंधित तालुक्यातील शासकीय आयटीआयमध्ये सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मेळावे होणार आहेत.
तालुकानिहाय तारखा
- शिराळा, उरूण ईश्वरपूर – 23 फेब्रुवारी 2026
- विटा, कडेगाव – 25 फेब्रुवारी 2026
- सांगली – 27 फेब्रुवारी 2026
- आटपाडी – 2 मार्च 2026
- पलूस, तासगाव – 4 मार्च 2026
- जत, कवठेमहांकाळ – 6 मार्च 2026
मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उद्योजकांकडून विविध पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुकांनी मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन प्रती सोबत आणाव्यात.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, विजयनगर, सांगली येथे संपर्क साधता येईल. (संपर्क : 0233-2990383).
हेही वाचा: आजार नाही अडथळा; सांगलीत एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी 1 मार्चला वधू-वर परिचय मेळावा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










