कडेगाव : वांगी (ता. कडेगाव) येथे घरासमोर बसलेल्या 75 वर्षीय वृद्धेची सोन्याची बोरमाळ हिसकावून पळ काढणाऱ्या दाम्पत्याला चिंचणी-वांगी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
14 फेब्रुवारी रोजी दुपारी शालन माळी या आपल्या घरासमोर बसल्या असताना पाणी मागण्याच्या बहाण्याने एक अनोळखी दाम्पत्य घरात आले. संधी साधून त्यांनी माळी यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसकावून पलायन केले. याप्रकरणी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रमोद माळी आणि रेश्मा साठे (सध्या रा. वांगी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान प्रमोद माळी याने कडेगाव व विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचेही उघड झाले आले. चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी दोघांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हेही वाचा : दिघंची पेट्रोल पंपावर मीटर रीडिंगमध्ये फेरफार; 9.22 लाखांचा अपहार केल्याचा आरोप, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










