आटपाडी : मुलाला घेऊन जाण्याच्या कारणावरून पारेकरवाडी (ता. आटपाडी) येथे दोन गटांत तीव्र वाद होऊन लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी घडली. या मारहाणीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले असून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दाजी पडळकर हे आपल्या कुटुंबासह मुलाला आणण्यासाठी सासरच्या गावी गेले होते. यावेळी झालेल्या वादानंतर परिस्थिती बिघडली. तक्रारीनुसार काही जणांनी त्यांना खाली पाडून मारहाण केली, तर एका आरोपीने लोखंडी गजाने डोक्यावर प्रहार केल्याचा आरोप आहे.
भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांनाही गजाने मारहाण झाल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. आईलाही ढकलून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेदरम्यान वाहनाचेही नुकसान करण्यात आले आहे आहे.
आटपाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: नेर्ले येथे भरदिवसा शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










