सांगली : शहरातील क्रीडा संकुले, उद्याने आणि सभागृहांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी धडक स्थळ पाहणी दौरा केला. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
गणेशनगर स्विमिंग टँक ट्रॅक, लोकमान्य व्यायाम शाळा, स्केटिंग ट्रॅक, वसंतदादा कुस्ती आखाडा, वकील कॉलनी व हनुमान नगर उद्यान, विष्णू अण्णा चिल्ड्रन पार्क, त्रिकोणी बाग तसेच गुलमोहर कॉलनी बॅडमिंटन हॉल व इतर सभागृहांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या कामांची मूळ मुदत काय होती आणि प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यास किती विलंब झाला, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली. मंजूर अंदाजपत्रकानुसार काम होत आहे का, याचीही पडताळणी करण्यात आली.
आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांच्या करातून केली जात असलेली ही कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. रेंगाळणाऱ्या कामांबाबत संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
नागरिकांना शहरातील उद्याने व क्रीडा सुविधांची कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. प्रशासनाच्या या पाहणीनंतर प्रत्यक्ष कामाची गती वाढते का, कि पुन्हा जैसे थे, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: आटपाडीतील तरुणांचा ‘फुला’ 17 एप्रिलला राज्यभर झळकणार; एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षकथा.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










