सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार व बसस्थानकांसाठी कंत्राटी तत्त्वावर सुरक्षा रक्षकांची भरती केली जाणार आहे. ही पदे केवळ माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2026 आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मिरज आगारासाठी 1 पद आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकासाठी 1 पद भरले जाणार आहे. ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को), सांगली किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे 12 मार्चपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
हेही वाचा: सांगलीसह 7 जिल्ह्यांतील तरुणांसाठी अग्निवीर भरतीची संधी; ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 1 एप्रिल 2026.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










