सांगली : सांगली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्ये देण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य वर्धन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. या केंद्रामुळे स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक उद्योगांच्या गरजांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये अत्याधुनिक शोध, नवोपक्रम, उष्मायन (Incubation) आणि प्रशिक्षण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी टाटा टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार असून या केंद्रात सुमारे ९ आधुनिक प्रयोगशाळा (Labs) उभारण्यात येणार आहेत.
अभियांत्रिकी तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक उद्योगांनाही आवश्यक कौशल्य असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
बैठकीला महाराष्ट्र शासनाचे समन्वयक प्रीतम गंजेवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, विविध विभागांचे अधिकारी, उद्योजक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
उद्योजकांनी बैठकीत दहावीपेक्षा कमी शिक्षण झालेल्या युवकांनाही कौशल्य प्रशिक्षण देण्याची मागणी केली. या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले की, अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्रे राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर सांगलीमध्येही अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
येथे वाचा: Education News Sangli.
हेही वाचा: सांगलीत एचआयव्हीबाधितांसाठी वधू-वर परिचय मेळावा; महाराष्ट्र-कर्नाटकातून 153 उमेदवारांची नोंदणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










