सांगली : सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि चार प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड 13 मार्च रोजी होणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीतील 16 सदस्यांसह महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समितीवरील सदस्यांची निवड यापूर्वी महासभेत करण्यात आली आहे. तसेच प्रभाग समिती क्रमांक एक, दोन, तीन आणि चार यांची रचना देखील करण्यात आली आहे.
या समित्यांच्या सभापती निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्याअनुषंगाने 13 मार्च रोजी सकाळी महापालिकेच्या राजाभाऊ जगदाळे सभागृहात या सर्व समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.
दरम्यान, स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे अतुल माने, स्वाती शिंदे आणि गणेश माळी यांची नावे चर्चेत असल्याची माहिती आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांचे समर्थक असलेल्या अतुल माने यांची या पदावर निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण समितीच्या सभापती पदासाठीही इच्छुकांमध्ये चुरस वाढली असून येत्या काही दिवसांत राजकीय हालचाली अधिक वेग घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Sangli Politics News.
हेही वाचा: सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










