सांगली : जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीत आयोजित ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला.
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतन, सांगली आणि शासकीय तंत्रनिकेतन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलींनी मोठी स्वप्ने पाहून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुलींच्या शिक्षणासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींसाठी शिक्षण शुल्क माफीसह विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हेही वाचा: ईश्वरपूरमध्ये निर्जन ठिकाणी ‘ओपन बार’; सात जणांवर पोलिसांची कारवाई.
- महिला दिनानिमित्त सांगलीत ‘नारीशक्ती संवाद’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करून केला सन्मान
- ईश्वरपूरमध्ये निर्जन ठिकाणी ‘ओपन बार’; सात जणांवर पोलिसांची कारवाई
- सांगली जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ सुरू; ७ मार्चपासून ६९ मंडळांमध्ये आयोजन
- सांगलीत पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून; संशयितास गोव्यातून अटक
- सांगलीत जलशुद्धीकरण केंद्र, शेरी नाला पंपहाऊसची आयुक्तांची पाहणी; अमरधाम गॅस दाहिनी दुरुस्तीचे आदेश
- वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे डंपर पलटी; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू









