सांगली : जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी एलपीजी कंपन्यांच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील साठा आणि वितरण व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.
प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या एचपीसीएल कंपनीचा ८८८ मेट्रिक टन, बीपीसीएलचा ९५७ मेट्रिक टन आणि आयओसीएलचा ५२ मेट्रिक टन इतका एलपीजी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले असून आतापर्यंत २१ गॅस एजन्सींची तपासणी करण्यात आली आहे. नियमभंग केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. एलपीजी संदर्भात तक्रार असल्यास नागरिकांना 18002333555 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
प्रशासनाने नागरिकांना गॅसच्या किंमती वाढतील म्हणून घाबरून गॅस किंवा इंधनाचा साठा करू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: सांगलीत LPG दर 55 वरून 80 रुपये; पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










