सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या विविध वैधानिक समित्या आणि प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया शुक्रवारी (१३ मार्च) रोजी पार पडली. या सर्व निवडी बिनविरोध झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महानगरपालिका मुख्यालयातील ‘कै. राजाभाऊ हरिभाऊ जगदाळे’ सभागृहात पीठासीन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
स्थायी समितीच्या सभापतीपदी अतुल दत्तात्रय माने यांची बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बानू मुसा जमादार, तर समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी गीता सूरज पवार यांची निवड करण्यात आली.
तसेच शहरातील चार प्रभाग समित्यांच्या सभापतीपदीही महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापतीपदी अश्विनी नंदकुमार कोळेकर, प्रभाग समिती क्रमांक २ च्या सभापतीपदी वैशाली राजू गवळी, प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सभापतीपदी माया सुभाष गडदे, तर प्रभाग समिती क्रमांक ४ च्या सभापतीपदी अश्विनी विनोद कोळी यांची निवड जाहीर करण्यात आली.
या निवडींमुळे महानगरपालिकेतील विविध समित्यांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










