आटपाडीतील तरुणांचा ‘फुला’ चित्रपट; राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत पोस्टर व संगीत प्रकाशन सोहळा

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
‘फुला’ चित्रपटाचे पोस्टर व संगीत प्रकाशन सोहळा; राजीव खांडेकर उपस्थित.

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील तरुणांनी तयार केलेल्या ‘फुला’ या मराठी चित्रपटाचा पोस्टर व संगीत प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. ज्येष्ठ पत्रकार आणि एबीपी माझा-एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर तसेच सॅक्सोफोन वादक राज सोडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

वाघ्या-मुरळी परंपरेच्या पार्श्वभूमीवर एका मुलीच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ आणि लोकसंस्कृतीचा वेध घेत ही कथा उभी करण्यात आली आहे.

‘फुला’ चित्रपटाची निर्मिती अजित शिवाजी जाधव यांनी केली असून दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे आहे. पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली असून संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले आहे.

चित्रपटात वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे आणि आकाश नवगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात ‘कान्हा तुझी बासरी’, ‘माझा राजा मल्हारी’, ‘आसरा तू माझ्या जीवाचा’, ‘कुंकू कोरलं कपाळी’, ‘मुरळी झाले मी गं बाई’, ‘कपाळी सजलं बाशिंग’ आणि ‘डर्बीचा थरार’ अशी सात गाणी आहेत. लोकसंस्कृतीवर आधारित हा चित्रपट 17 एप्रिलपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: आष्टा-इस्लामपूर रोडवर भरधाव दुचाकीची धडक; तरुण गंभीर जखमी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा