वाळवा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर केदारवाडी परिसरात झालेल्या अपघातात ट्रक चालक संजय एकनाथ साळुंखे (रा. दाबकेघर, ता. खंडाळा, जि. सातारा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
9 फेब्रुवारी रोजी फलटण येथून माल भरून शिमोगा (कर्नाटक)कडे निघालेल्या साळुंखे यांचा ट्रक 10 फेब्रुवारीच्या पहाटे केदारवाडी परिसरात आला असता हा अपघात घडला.
हायवेवरील पहिल्या लेनमध्ये एक ट्रक उभा होता. मात्र त्या ट्रकला कोणतेही पार्किंग लाईट किंवा मागे इशारा देणारे बॅरेकेट लावलेले नव्हते. त्यामुळे तो ट्रक न दिसल्याने साळुंखे यांच्या ट्रकने त्याला मागून जोरात धडक दिली.
या अपघातात साळुंखे गंभीर जखमी झाले. सुरुवातीला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना पुण्यात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 27 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी निष्काळजीपणे रस्त्यावर ट्रक उभा करणारा चालक आरीफ मोनस अली (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीत पुढील 3 तासांत पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










