सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट: ५७ टँकरद्वारे सव्वा लाख नागरिकांना पाणीपुरवठा; जत तालुक्याला सर्वाधिक फटका

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; ५८ गावांना ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना गतिमान केल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५० खाजगी आणि ७ शासकीय अशा एकूण ५७ टँकर्सद्वारे ५८ गावे आणि ४१५ वाड्यांमधील सुमारे १ लाख २१ हजार ६३६ बाधित नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत ३१ खाजगी विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे.

जिल्हा परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, बाधित भागातील नागरिकांसोबतच ११ हजार ३४६ पशुधनासाठीही टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

जत तालुक्याला सर्वाधिक झळ 

जिल्ह्यात जत तालुक्याला तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. जत तालुक्यातील ४९ गावे आणि ३४६ वाड्यांमधील सुमारे १ लाख ४ हजार २५६ लोकसंख्येसाठी एकट्या जत तालुक्यात ४८ टँकर्स (४२ खाजगी व ६ शासकीय) धावत आहेत. याशिवाय जतमध्ये टंचाईवर मात करण्यासाठी २० खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून २ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.

तालुकानिहाय परिस्थिती पुढीलप्रमाणे:

  • आटपाडी: ७ गावे आणि ५५ वाड्यांमधील १४ हजार ६९१ नागरिकांसह ११ हजार ३४६ पशुधनासाठी ७ खाजगी टँकर सुरू असून ३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
  • कवठेमहांकाळ: १ गाव आणि ८ वाड्यांमधील १८३४ लोकसंख्येसाठी १ शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणीपुरवठा विहिरीतील पाणी घटल्याने २ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
  • तासगाव: १ गाव आणि ६ वाड्यांमधील ८५५ नागरिकांसाठी १ खाजगी टँकर सुरू असून ३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
  • खानापूर: २ गावे टंचाईग्रस्त असून उपाययोजना म्हणून ३ खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन मागणीनुसार आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ टँकर मंजूर करणे आणि विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने राबवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Diwali 2026: लाडक्या बहिणींसाठी यंदाची दिवाळी खास! अवघ्या ₹१० हजारांच्या आत मिळतात सोन्याचे ‘हे’ ६ सुंदर कानातले; पाहा लेटेस्ट डिझाईन्स आणि दर.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा