जत शहराच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाचे मोठे पाऊल; सात नवीन उद्यानांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
जत शहरातील सात उद्यानांच्या विकासासाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर; विविध प्रभागांत सुसज्ज उद्याने उभारली जाणार आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

जत / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): जत शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि हरित विकासासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत जत नगरपरिषद क्षेत्रातील सात विविध ठिकाणी सुसज्ज उद्यानांची निर्मिती व विकास करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या मंजूर निधीची माहिती देत राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

शासन निर्णयानुसार सन २०२६ ते २०२७ या आर्थिक वर्षासाठी हा १०० टक्के राज्य शासन अनुदान निधी प्राप्त झाला असून, या कामांची अंमलबजावणी जत नगरपरिषदेमार्फत केली जाणार आहे. या निधीतून जत शहरातील विविध भागांतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी विरंगुळ्याची आणि हिरवीगार उद्याने उपलब्ध होणार आहेत. सर्व कामे ई-निविदा प्रक्रियेद्वारे पारदर्शकपणे राबवून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेने पूर्ण करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचा: सांगलीत विश्रामबाग आणि विष्णुघाट परिसरात बंद फ्लॅट फोडून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास.

मंजूर झालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून प्रभाग क्रमांक एकमधील विठ्ठलनगर येथील नगरपरिषदेच्या खुल्या जागेत नवीन उद्यान उभारण्यासाठी ८० लाख रुपये, प्रभाग क्रमांक दोनमधील महात्मा बसवेश्वर चौकात बसवेश्वर उद्यान बनवण्यासाठी ८० लाख रुपये आणि प्रभाग क्रमांक सहामधील भूमिअभिलेख कार्यालयासमोर उद्यान विकसित करण्यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याशिवाय प्रभाग क्रमांक सात मधील यशवंत नगर येथे उद्यान विकसित करण्यासाठी ८० लाख रुपये, प्रभाग क्रमांक आठमधील विद्यानगर येथे उद्यान उभारण्यासाठी ८० लाख रुपये, प्रभाग क्रमांक दहामधील धानेश्वरी नगरात धानेश्वरी उद्यान बनवण्यासाठी ८० लाख रुपये आणि प्रभाग क्रमांक दहामधीलच चैतन्य उद्यान विकसित करण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सातही उद्यानांमुळे जत शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

हेही वाचा: सराफा बाजारातील ताजे दर जाहीर; जाणून घ्या महाराष्ट्र आणि सांगलीतील आजचा सोन्याचा भाव.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा