Sangli Krishna River Water Level : कोयनेतून विसर्ग वाढला, कृष्णेची पाणी पातळी वाढली; नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Krishna River Water Level 14 Feet

Sangli Krishna River Water Level Today | सांगली : रविवारी जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी कोसळल्या, पण दिवसाढवळ्या उन्हाची कडाक्याची तीव्रता कायम होती. मात्र, कोयना धरणातून वाढवलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढली असून कृष्णेची पाणी पातळी 14 फुटांवर पोहोचली आहे. हरिपूर परिसरात नदीचे पाणी शेतांमध्ये घुसल्याने नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे.

कोयना धरणाचे चार वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूट उंचीवर उघडण्यात आले असून त्याद्वारे 6,400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर आणखी दोन दरवाजे उघडले गेले व 3,200 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. तसेच पायथा विद्युतगृहाच्या दोन युनिटमधून 2,100 क्युसेक विसर्ग होत आहे. एकूण 11,700 क्युसेक पाणी कोयनेतून सोडले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या वाढलेल्या विसर्गाचा परिणाम म्हणून सांगलीत तीन दिवसांत कृष्णा नदीची पातळी 14 फुटांवर पोहोचली आहे. नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

जिल्ह्यात 1 ते 21 सप्टेंबरदरम्यान 94.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सरासरी 1.3 मि.मी. पाऊस झाला. मात्र पाणी पाटळी वाढल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.

हेही वाचा: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा