Kavathe Ekand : कवठेएकंद येथे शोभेच्या दारूचा स्फोट; आठ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Kavathe Ekand Firecracker Blast 2025

Kavathe Ekand News | सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद (ता. तासगाव) येथे रविवारी दसऱ्याच्या पारंपरिक सोहळ्यासाठी तयार केल्या जात असलेल्या शोभेच्या दारूचा स्फोट झाला. या दुर्घटनेत आठ जण भाजून जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमींमध्ये आशुतोष बाळासाहेब पाटील (वय १६), आनंद नारायण यादव (वय ५५), विवेक आनंदराव पाटील (वय ३८), गजानन शिवाजी यादव (वय २८), अंकुश शामराव घोडके (वय २१), प्रणव रवींद्र आराधे (वय २१), ओमकार रवींद्र सुतार (वय २१) व सौरभ सुहास कुलकर्णी (वय २७) यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, गावातील ब्राह्मण गल्लीतील पत्र्याच्या शेडमध्ये मंडळाचे कार्यकर्ते शोभेची दारू तयार करत होते. चाचणीदरम्यान अचानक दारूने पेट घेतला आणि स्फोट झाला. यामुळे मोठी दुर्घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

गावात दसऱ्यानिमित्त शोभेच्या दारूचे प्रदर्शन करण्याची दीर्घ परंपरा आहे. पालखी सोहळ्यात मानकऱ्यांच्या उपस्थितीत दारूकाम सादर केले जाते. मात्र या दुर्घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून सोलापूर पूरग्रस्तांना मदत.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा