आष्टा : आष्टा-वडगाव रस्त्यावर शनिवारी (दि. 14) पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने बागणी परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रसाद सुनील बामणे (वय 19, रा. बागणी, ता. वाळवा) आणि संदेश मिथुन भंडारे (वय 21, सध्या रा. बागणी, मूळ रा. मालगाव, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.
दोघेजण पहाटे दुचाकीने बागणीकडून आष्ट्याकडे येत होते. फाळकेवाडी येथील लक्ष्मी मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट झाडावर जाऊन धडकली. अपघात निर्जनस्थळी आणि पहाटेच्या सुमारास झाल्याने दोघांना वेळेवर मदत मिळू शकली नाही.
सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोघांना आष्टा ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डोक्याला गंभीर दुखापत व अतिरक्तस्राव हे मृत्यूचे प्राथमिक कारण असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून आष्टा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: कवलापूर विमानतळाचा मुहूर्त जवळ? केंद्राची टीम पाहणीला, जिल्ह्यात उत्सुकता वाढली.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









