मिरज : मिरज–दक्षिण पश्चिम रेल्वे विभागातून बंगळुरू आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान नवीन एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडी नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार, प्रस्तावित बंगळुरू–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही आधुनिक एलएचबी प्रकारच्या १७ बोग्यांसह चालविण्यात येणार आहे. या गाडीला मिरजसह सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण आणि ठाणे अशा प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ही एक्स्प्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ८.३५ वाजता, तर बंगळुरू येथून रात्री १०.३० वाजता सुटणार आहे. बंगळुरूहून मंगळवार व शनिवार, तर मुंबईहून बुधवार व रविवार या दिवशी गाडी धावण्याचे नियोजन आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या गाडीमुळे मिरज, सांगली आणि परिसरातील प्रवाशांना मुंबई व बंगळुरूकडे जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः शिक्षण, नोकरी व उद्योगधंद्याच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सुटणारी गाडी खूपच उपयुक्त ठरू शकते.
दरम्यान, ही गाडी सुरू होण्याबाबत अंतिम अधिसूचना व अधिकृत वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात होणार आहे.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद; तीन दिवसांत हजारो अर्जांची विक्री.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










