सांगली : आगामी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, सर्वच 78 प्रभागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काही अपक्ष व मित्र पक्षातील उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती भाजपचे निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांनी दिली.
इनामदार यांनी सांगितले की, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज केले होते. सुमारे 570 इच्छुकांमधून 78 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले असून, या प्रक्रियेमुळे काही प्रभागांमध्ये नाराजीही दिसून आली आहे. मात्र, नाराज इच्छुकांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्याशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेले उमेदवार हे स्थानिक पातळीवर ताकदीचे असून, निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले आहेत, असेही इनामदार यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेत पक्षातील अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेते कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर आधारित असून, सांगली महापालिकेवर भाजपची सत्ता येईल, असा ठाम विश्वास इनामदार यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील एक सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










