सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकीय हालचालींना वेग आला. उमेदवारी मिळाल्याच्या आनंदात तर काही ठिकाणी पक्षाने डावलल्याने ताकद दाखवण्यासाठी, शेकडो उमेदवारांनी आज अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केले.
निर्धारित वेळ संपल्यानंतरही अर्ज दाखल करण्यासाठी प्रवेशद्वारात उपस्थित असलेल्या उमेदवारांना कक्षात प्रवेश देत प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे सायंकाळपर्यंत निवडणूक कार्यालयांच्या परिसरात गडबड आणि गर्दी कायम होती.
बंडखोरी टाळण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी शेवटपर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने गोंधळ वाढल्याचे चित्र दिसून आले. महाविकास आघाडीत अपेक्षित जागा न मिळाल्याने शिवसेना ठाकरे गटाने सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महायुतीतून बाहेर पडलेल्या शिवसेना शिंदे गटानेही स्वबळावर सर्वच 78 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 33 जागांसाठी एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपमध्ये काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी दिसून आली. त्यातून काही ठिकाणी बंडखोरी उफाळून आली असून, माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा: भाजप स्वबळावर मैदानात; सांगली महापालिकेच्या सर्व 78 जागांसाठी उमेदवार जाहीर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










