सांगली : कर्नाटकातील चिंचली मायाक्का देवीची यात्रा संपल्यानंतर मिरज ते सांगली मार्गावर हुल्लडबाजी करत वाहतुकीस अडथळा व सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वार आणि घोडागाडी चालकांवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. सोशल मीडियावरून पोलिसांना आव्हान देणे तसेच सांगलीत रस्त्यावर मध्यरात्री हुल्लडबाजी करण्याऱ्यांवर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
मायाक्का देवीच्या यात्रेनंतर दरवर्षी चिंचली ते सांगलीवाडी पर्यंत घोडागाडी शर्यतीच्या नावाखाली आरडाओरड, वेगात वाहन चालवणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे प्रकार घडतात. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यंदाही काही हुल्लडबाजांनी बेकायदेशीररित्या मिरज मार्गे सांगलीकडे कूच करत गोंधळ घातला.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास म्हैसाळ आणि मिरज परिसरात पोलिसांनी काही जणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही अनेक दुचाकीस्वार पोलिसांना न जुमानता सांगलीकडे आले. यानंतर सांगलीतील हरभट रोड ते टिळक चौक परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून हुल्लडबाजांवर कडक कारवाई केली.
कारवाईदरम्यान काही जणांनी दुचाकी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर काहींना पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागला. पोलिसांच्या प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पाहण्यासाठी टिळक चौक परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सांगली पोलिसांनी दिला आहे.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









