वाळवा तालुक्यातील देवर्डेत कारची दुचाकीला जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
वाळवा तालुक्यातील देवर्डे येथे भरधाव कारची दुचाकीला धडक; तिघे गंभीर जखमी. (प्रातिनिधिक छायाचित्र)

कुरळप : वाळवा तालुक्यातील देवर्डे गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवर्डे येथील विलास देसाई यांच्या घराजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संग्राम भोसले (वय 24), हरिबा लोहार आणि महादेव कुंभार (सर्व रा. चिकुर्डे, ता. वाळवा) हे तिघेजण गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी कार चालक संतोष काळभोर (रा. पुणे) याच्याविरोधात कुरळप पोलिसांत निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले असून कुरळप पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: बनावट खाते उघडून 2 लाखांचे कर्ज; समडोळीत पिग्मी एजंटासह तिघांवर गुन्हा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा