सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी येथे बनावट कागदपत्रे आणि सह्यांचा वापर करून एका कुटुंबाच्या नावे पतसंस्थेत खाते उघडून त्यावर 2 लाखांचे कर्ज काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी स्वप्निल मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पिग्मी एजंट प्रवीण मस्कर, सचिव जयपाल ढोले आणि अध्यक्ष प्रदीप खोत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या व त्यांच्या आई-वडिलांच्या नावाने संबंधित पतसंस्थेत खाते नसतानाही संगनमताने बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे खाते उघडण्यात आले. त्या खात्यावर 2 लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले गेले. जामीनदाराचीही बोगस स्वाक्षरी करण्यात आली.
एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले असून सांगली ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: अडीच तास ‘श्रीमंतयोगी’चा थरार; मिरजेतील बालगंधर्वात प्रेक्षकांची उत्स्फूर्त गर्दी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










