Sangli News | सांगली : सांगली जिल्हा व सत्र न्यायालय, विजयनगर येथे माजी पालकमंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. हा क्षण भावनिक आणि स्मरणरंजन करणारा असल्याचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
पूर्वी सांगली जिल्हा न्यायालय आणि कलेक्टर कार्यालय राजवाडा परिसरात कार्यरत होते. अपुरी जागा, पार्किंगची कमतरता आणि जुन्या इमारतींमुळे नागरिक, वकील तसेच कर्मचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सांगलीचे न्यायालय व प्रशासकीय कार्यालय आधुनिक, प्रशस्त आणि सुस्थितीत असावे, ही स्व. डॉ. पतंगराव कदम यांची इच्छा होती.
पालकमंत्री असताना एका दौऱ्यादरम्यान भारती विद्यापीठ परिसरात असलेली मोकळी शासकीय जमीन त्यांच्या नजरेत भरली. ही जमीन कृषी विभागाच्या ताब्यात असली तरी त्यांनी तात्काळ निर्णय घेत ती प्रशासकीय कामांसाठी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्या एका धाडसी निर्णयामुळे आज विजयनगर येथे जिल्हा न्यायालय, कलेक्टर कार्यालय आणि प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या.
यानंतर तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्याकडून निधी मंजूर करून घेण्यात आला आणि स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी स्वतः लक्ष घालून या इमारतींचे काम पूर्णत्वास नेले. आज या वास्तूंमुळे लाखो नागरिकांची कामे अधिक सुलभ, सन्मानाने आणि वेळेत पार पडत आहेत.
स्वतः वकिलीचे शिक्षण घेतलेल्या डॉ. पतंगराव कदम यांनी वकिलांच्या समस्या आणि न्यायालयीन पायाभूत सुविधांना नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या तैलचित्रासमोर उभे राहून तोच वारसा पुढे नेण्याचा संकल्प केल्याचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती, सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकीलवर्ग तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा: भाजप–अजित पवार गटात ‘मैत्रीपूर्ण’ लढतीचे संकेत; सांगली महापालिकेत तिरंगी लढतीची शक्यता.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










