Jagar Adishakticha 2025 Vita | सांगली (विटा) : सौ. शोभाकाकी बाबर फाउंडेशन आणि सौ. शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयाच्या वतीने यावर्षी “जागर आदिशक्तीचा – 2025” या भव्य महिलाकेंद्रित तालुकास्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २५ सप्टेंबर पासून ते शनिवारी दि. २७ सप्टेंबर पर्यंत विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून महिला व मुलींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे.
“स्त्री-घरची शोभा” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात १६ वर्षांवरील महिलांना प्रवेश मोफत आहे. यात मेहेंदी, पाककला, रांगोळी, प्रश्नमंजुषा, फेस पेंटिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, भव्य डान्स स्पर्धा तसेच मिस ब्युटी क्वीन अशा अनेक स्पर्धांचा समावेश आहे. सर्व स्पर्धांमध्ये पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
शनिवारी (दि. २७ सप्टेंबर) बक्षीस वितरण समारंभानंतर दांडिया खेळ आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक आणि सांस्कृतिक रंग चढणार आहे.
या उपक्रमाबाबत आयोजक समितीने सांगितले की, “महिलांना आपल्या कलागुणांना अभिव्यक्त करण्याची ही उत्तम संधी आहे. विविध स्पर्धांमधून महिला आत्मविश्वासाने पुढे येत आहेत. समाजजीवनात त्यांचा सहभाग अधिक ठळक व्हावा हा या उपक्रमाचा हेतू आहे.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक स्वयंसेविका आणि महाविद्यालयातील शिक्षकवर्ग सक्रियपणे सहभागी झाले आहेत. नावनोंदणीसाठी विविध समिती सदस्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

हेही वाचा: सांगली जिल्ह्यावर पुन्हा पावसाचे संकट; या तारखेरदरम्यान सतर्कतेचा इशारा.