सांगली : जत तालुक्यात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा मिनी ट्रक आणि 27 लाख 58 हजार 80 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 11 मार्च रोजी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचनालयाच्या (DGGI) पुणे विभागीय युनिटच्या पथकाने 16 ऑक्टोबर 2025 रोजी जत येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करताना MH09FL3756 क्रमांकाचे वाहन ताब्यात घेतले होते. त्यानंतर संबंधित कागदपत्रांच्या आधारे जप्त साठा आणि वाहन अन्न सुरक्षा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.
यानंतर अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, आरएमडी पान मसाला तसेच विविध प्रकारच्या सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. महाराष्ट्र शासनाने गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांच्या निर्मिती, साठवण, वाहतूक व विक्रीवर बंदी घातलेली असतानाही वाहतूक सुरु असल्याने हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान वाहन चालक दत्तात्रय बाळासो शिंदे (वय 32, रा. शिंदेवाडी, शेगाव, ता. जत) याने हा साठा मारुती इंगोले (उर्फ नाना देशमुख, रा. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचे सांगितले.
या प्रकरणी दत्तात्रय बाळासो शिंदे आणि मारुती इंगोले यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: ईश्वरपूरमध्ये हॉटेलजवळ उभी केलेली दुचाकी चोरीस; पोलिसांत गुन्हा दाखल.
- अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’
- सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती
- कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या
- 7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; बुधगाव येथे 14 मार्चला विशेष शिबिर









