जत : जत तालुक्यातील विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात वनविभागाचे हंगामी वॉचमन जागीच ठार झाले. ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत दिलीप मारुती जाधव (वय ३५, रा. तोळबोळवस्ती, मुचंडी, ता. जत) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप जाधव हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून वनविभागात हंगामी वॉचमन म्हणून कार्यरत होते. मुचंडी गावालगत असलेल्या वनक्षेत्रात देखरेखीचे काम आटोपून ते सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्याच वेळी जतहून विजापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दिलीप जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत जाधव यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जत पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: कवलापूर विमानतळाबाबत नागरिकांचे थेट प्रश्न; सरकार उत्तर देणार का?.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










