जत तालुक्यात महसूल समाधान शिबिर; 7/12 दुरुस्तीपासून पीएम किसान योजना नोंदणीपर्यंत 15 सेवा एकाच ठिकाणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
जत तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; 7/12 दुरुस्तीपासून पीएम किसान योजना नोंदणी, नवीन रेशन कार्ड अशा विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध. (प्रतिनिधिक छायाचित्र)

सांगली, दि. 5 : जत तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरांमधून महसूल विभागाच्या 15 महत्त्वाच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी आणि एकाच दिवशी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांना महसूल विभागाच्या सेवा त्वरित व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा या शिबिरांचा मुख्य उद्देश असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिली.

या अभियानांतर्गत जत तालुक्यात मार्च महिन्यात 7 मार्च व 14 मार्च, एप्रिल महिन्यात 10 एप्रिल व 17 एप्रिल, तसेच मे महिन्यात नगरपरिषद / नगरपंचायत स्तरावर 8 मे व 15 मे रोजी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

फेरफार प्रकरणांचा निपटारा, 7/12 व 8अ उताऱ्यांतील दुरुस्ती, जात, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेअर दाखला, ई-मोजणी अर्ज, पीएम किसान योजना नोंदणी, नवीन रेशन कार्ड, नाव दुरुस्ती, तक्रार निवारण तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन अशा सेवा या शिबिरांमध्ये दिल्या जाणार आहेत.

नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरात उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

येथे वाचा: सांगली नागरिक प्रश्न.

हेही वाचा: दोन वर्षांपूर्वीच्या वादातून मिरजेत कोयत्याने दुकानाची तोडफोड; सराईत गुन्हेगारास अटक.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा