Sangli Crime : कवलापूरमधील जबरी चोरीचा छडा; दोन तरुणांना अटक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र : Sangli Today

सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे दहा दिवसांपूर्वी झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणात अनिकेत अरुण मोहिते (वय 26) आणि राजेश संभाजी काटकर (वय 29, दोघे रा. कवलापूर, ता. मिरज) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील प्रतीक दिनेश पवार यांना ५ जानेवारी रोजी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघा संशयितांनी त्यांच्यावर तात्पुरते बेशुद्ध करणारा स्प्रे फवारून त्यांच्याकडील मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दुचाकी घेऊन आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले होते.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करत होते.

दरम्यान, पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संबंधित जबरी चोरीतील संशयित सूतगिरणी चौक ते यशवंतनगर रस्त्याच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा