Sangli Crime : कवठेएकंद येथील शोभेच्या दारू स्फोटप्रकरणी सात जखमींविरोधात गुन्हा दाखल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Kavathe Ekand Fireworks Blast Case FIR 2025

Sangli Crime News | तासगाव : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे रविवारी झालेल्या शोभेच्या दारू स्फोटप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात जखमी सात जणांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार श्रीकांत जयगोंडा अभंगे यांनी फिर्याद नोंदवली.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आनंद नारायण यादव (55), विवेक आनंदराव पाटील (38), गजानन शिवाजी यादव (29), अंकुश शामराव घोडके (21), प्रणव गोविंद आराध्ये (21), ओमकार रवींद्र सुतार (21) आणि सौरभ सुहास कुलकर्णी (27, सर्व रा. कवठेएकंद) यांचा समावेश आहे.

दसऱ्यानिमित्त बिर्‍हाडसिद्ध देवाच्या पालखी सोहळ्यासाठी गावातील समाजमंदिरात शोभेच्या दारूची निर्मिती सुरू होती. मात्र, कोणताही परवाना न घेता आणि कोणतीही आवश्यक खबरदारी न घेतल्याने स्फोट होऊन आठ जण जखमी झाले.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ज्वालाग्राही पदार्थांबाबत निष्काळजीपणा दाखवून स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने सात जणांविरोधात स्फोटक पदार्थ अधिनियम 1884 कलम 5 (3)(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: सांगली LCB पथकाची मोठी कारवाई. २२ वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.