‘माझी वसुंधरा ५.०’मध्ये सांगलीची हॅट्रिक; मिळवले 10.75 कोटींचे बक्षीस

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
पर्यावरण संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियान; सांगली जिल्हा राज्यात प्रथम. | प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेला सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण 10 कोटी 75 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

राज्यस्तरीय मूल्यांकनात जलसंधारण, वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त उपक्रम, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यांसारख्या घटकांवर झालेल्या कामाच्या आधारे सांगली जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये तासगाव प्रथम, मिरज द्वितीय आणि कवठेमहांकाळ तृतीय क्रमांकावर आहे. बोरगाव, कासेगाव, येडेनिपाणी, आळसंद, वाळेखिंडी, नांगोळे, लंगरपेठ, पिंपळवाडी, पेठ, सलगरे, अग्रण धुळगाव आणि अलकूड या ग्रामपंचायतींनी आपल्या लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

या पारितोषिकाच्या रकमेतून संबंधित ग्रामपंचायतींमधील पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्वच्छता उपक्रमांना चालना मिळणार आहे.

सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनाही ‘सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे.

हेही वाचा: सलग दुसऱ्या दिवशी फिरला बुलडोझर; सांगली बसस्थानक-100 फुटी रोड परिसरातील 22 अतिक्रमणे हटवली.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा