मिरज : महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच मिरजेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षांतराच्या हालचालींनी जोर धरला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील काही आजी-माजी नगरसेवक व दिग्गज नेते थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.
काल पुण्यातील बारामती हाऊस येथील विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुमारे दीड तास बंदद्वार चर्चा झाली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटातून उमेदवारी मिळावी, या उद्देशाने ही भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या बैठकीस किशोर जामदार, करण जामदार, रमजान सतारमेकर, आनंदा देवमाने, संजय मेंढे, चंद्रकांत हुलवान, आझम काजी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, शिवाजी दुर्वे, अरिफ चौधरी यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. बैठकीदरम्यान मिरज-सांगलीतील राजकीय समीकरणे, निवडणुकीतील शक्यता आणि स्थानिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
दरम्यान, आमदार इद्रिस नाईकवडी, पद्माकर जगदाळे आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पक्षप्रवेशाचा औपचारिक प्रस्ताव मांडला. मात्र किशोर जामदार यांनी अंतिम निर्णयासाठी चार दिवसांची मुदत मागितल्याने पक्षप्रवेशाची घोषणा तात्पुरती लांबणीवर पडली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील अस्वस्थता आणि सत्ताधारी गटाकडे होणारी हालचाल यामुळे मिरजेतील राजकीय चित्र लवकरच बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: बलगवडे सौर प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; शेळ्या-मेंढ्यांसह रास्ता रोको, वाहतूक ठप्प.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









