Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ e-KYC संदर्भात महत्त्वाची सूचना; लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ e-KYC संदर्भात महत्त्वाची माहिती | फोटो : संकलन – Sangli Today

Majhi Ladki Bahin Yojana Ekyc Verification Latest Update | सांगली : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या e-KYC (Ladki Bahin Yojana Ekyc) प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देत, काही लाभार्थी महिलांचे प्रत्यक्ष (Physical Verification) करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, e-KYC प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याची बाब निदर्शनास आली आहे.

त्यामुळे, योजनेच्या निकषांनुसार पात्रता तपासण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ही पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे.

या प्रक्रियेमुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ योग्यरित्या मिळावा, तसेच कोणत्याही चुकीच्या नोंदीमुळे लाभ अडू नये, हा यामागचा उद्देश असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान लाभार्थी महिलांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली लागू; ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर नोंदणी अनिवार्य.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा