सांगलीतील भटक्या कुत्र्यांचा उच्छाद पुन्हा चर्चेत; कोल्हापूर रोडवरील हल्ल्यानंतर प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली शहरात मोकाट भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे | फोटो : Sangli Today

सांगली : सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास पुन्हा एकदा गंभीर बनल्याचे समोर आले आहे. काही आठवड्यांपूर्वी लहान मुलावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी (२० जानेवारी) भरदिवसा कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटल परिसरात एका व्यक्तीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार, सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास 100 फुटी रोड वरील गॅरेज लाईन परिसरातुन चालत जात असलेल्या एका व्यक्तीवर अचानक कुत्र्याने झडप घालत हाताचे लचके तोडले. मोठ मोठ्याने ओरडत ती व्यक्ती रस्त्यावरून पळू लागल्यानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमी व्यक्तीचे नाव अधिकृतरीत्या अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, या घटनेनंतर शहरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सांगली महापालिका क्षेत्रात रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी वसाहतींमध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, २७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्राणी जन्म नियंत्रण (ABC) कार्यक्रम, नसबंदी मोहिमा आणि रेबिज प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यावरही त्या बैठकीत भर देण्यात आला होता.

तथापि, या निर्देशांनंतरही शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सुरूच असल्याने, प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ e-KYC संदर्भात महत्त्वाची सूचना.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा