Palus Election Result 2025 : पलूसमध्ये काँग्रेसची सत्ता कायम; नगराध्यक्षपदासह 16 जागांवर विजय, विश्वजीत कदमांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Palus Nagarparishad Election Result 2025 Congress Victory | (फोटो : X / Dr. Vishwajeet Kadam)

Sangli Today | पलूस : पलूस नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदासह १६ जागांवर विजय मिळवून काँग्रेसने प्रतिस्पर्ध्यांना मोठा धक्का दिला.

नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेसच्या संजिवनी सुहास पुदाले यांनी ६,८८१ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योत्स्ना येसुगडे यांचा १,३५० मतांनी पराभव केला. निकाल जाहीर होताच पलूस शहरात फटाके, गुलाल आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

या निवडणुकीत काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देत संघटनात्मक बदलांचा धाडसी निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याचा थेट फायदा पक्षाला मिळाल्याचे निकालातून दिसून आले. दुसरीकडे, राष्ट्रवादीला केवळ चार, तर भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. महायुती करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रवादीसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान उभे राहिले आहे.

विजयानंतर बोलताना नूतन नगराध्यक्षा संजिवनी पुदाले यांनी, “मतदारांनी दिलेल्या विश्वासाचे सोन करून पलूसच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू,” असा विश्वास व्यक्त केला. या निकालामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे मनोबल वाढले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाला बळ मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा: महायुती-महाआघाडीचा अंतिम निर्णय 23 डिसेंबरनंतर; इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा