PSI Pre Exam 2025 : वयोमर्यादेमुळे उमेदवार अपात्र; आमदार गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे वयोसवलतीची मागणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
PSI Pre Exam 2025 वयोसवलत मागणी : आमदार गोपीचंद पडळकर – फोटो : Sangli Today

सांगली : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या वयोमर्यादेमुळे अनेक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अपात्र ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या संदर्भात जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

२९ जुलै २०२५ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, त्यामध्ये वयोमर्यादा गणनेची तारीख १ नोव्हेंबर २०२५ अशी नमूद करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी ३१ वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी ३४ वर्षे ही वयोमर्यादा लागू आहे. मात्र जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेमुळे परीक्षेस अपात्र ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आमदार पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात सुमारे सात महिने उशिरा प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी जाहिरात उशिरा आल्याने शासन निर्णयानुसार एक वर्षाची वयोसवलत देण्यात आली होती. तसेच २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई भरतीसाठीही वयोसवलत लागू करण्यात आली होती, असा दाखला निवेदनात देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, PSI पदासाठी एक वर्षाची वयोसवलत देण्यात यावी किंवा किमान वयोमर्यादा गणनेची तारीख १ जानेवारी २०२५ गृहीत धरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही सातत्याने ही मागणी होत आहे.

राज्य शासनाकडून या निवेदनावर कोणती भूमिका घेतली जाते, याबाबत पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी वयोसवलतीबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेले निवेदन
फोटो : PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी वयोसवलतीबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेले निवेदन – सौजन्य : Official Letter

हेही वाचा: 31 डिसेंबर व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कडक नाकाबंदी; पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा