सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असून, प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मांडली. सांगली शहरात झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेले राजेश नाईक आणि निवडणूक समिती अध्यक्षपदी निवड झालेले मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार कदम म्हणाले, गेल्या पाच वर्षांत प्रभागातील लोकांमध्ये सक्रिय राहिलेले आणि जनतेशी प्रत्यक्ष संपर्क ठेवणारे कार्यकर्ते कोण आहेत, याचा आढावा घेऊनच उमेदवारीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. कोणावर अन्याय झाल्यास त्याची दखल घेतली जाईल, मात्र महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढून जिंकण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.
खासदार विशाल पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन करत सांगली शहर व जिल्ह्यात काँग्रेस विचारसरणीला मोठा पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले. उमेदवारी प्रक्रियेदरम्यान नाराजी संभवते, मात्र सर्वांनी एकत्र राहून पक्ष मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनियुक्त शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांनी काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर कार्यक्रमात उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनीही महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने संघटनात्मक तयारी वाढवण्याची गरज व्यक्त केली.
काही नवीन कार्यकर्त्यांनी कार्यक्रमादरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहितीही देण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर हालचाली वाढल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.
हेही वाचा: म्युल अकाउंटद्वारे सायबर फसवणूक : सांगलीत मोठ रॅकेट उघड, 34 डेबिट कार्ड, अनेक सिमकार्डसह संशयित अटकेत.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










