Sangli Dry Day : सांगलीत ड्राय डे लागू असतानाही शहरालगतच्या भागात दारू दुकाने सुरू; बंदीचा परिणाम काय?

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र : Sangli Today

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत १३ ते १६ जानेवारीदरम्यान ‘ड्राय डे’ लागू करण्यात आला असला, तरी शहरालगतच्या काही भागांत दारू विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सांगली शहरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेला माधवनगर रोड परिसर महानगरपालिका हद्दीत येत नसल्याने, त्या भागातील हॉटेल्स, बार आणि दारूची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक ड्राय डेच्या कालावधीत त्या भागात जाऊन मद्यपान करत असल्याचे तसेच दारूची खरेदी करत असल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे.

विशेषतः संध्याकाळच्या वेळेत माधवनगर रोड परिसरातील दारू दुकाने आणि बार परिसरात मोठी गर्दी होत असल्याचेही आढळून येत आहे. सांगली शहरात मद्यविक्रीवर पूर्ण बंदी असताना, शहरालगतच्या हद्दीबाहेरील भागात विक्री सुरू असल्याने ड्राय डेचा प्रत्यक्ष परिणाम मर्यादित राहतोय, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ड्राय डे आदेश महानगरपालिका हद्दीपुरताच लागू असल्याने, प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन होत नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने लागू केलेल्या ड्राय डेचा अपेक्षित परिणाम कितपत साध्य होतोय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा वाजेगाव घरफोडी प्रकरणी सराईत आरोपी अटकेत; २.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा