पैशांवरून वाद; बापाच्या खुनाप्रकरणी मुलाला आजन्म कारावास

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
आसंगी खून प्रकरणी न्यायालयाचा निकाल; आरोपी मुलाला जन्मठेप. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : पैशांच्या वादातून वडिलांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी मुलाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.

आसंगी (ता. जत) येथील देवाप्पा खिराप्पा मोडे (५५) यांचा २०२१ मध्ये खून झाला होता. या प्रकरणी पत्नी कस्तुरा मोडे यांनी मुलगा प्रविण मोडे (२३) याच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने बाहेरगावी जाण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्याच्या रागातून त्याने वडिलांच्या छातीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

उमदी पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. घटनेवेळी आरोपीची आई उपस्थित असल्याची बाब न्यायालयात महत्त्वाची ठरली. तिची प्रत्यक्षदर्शी साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस आजन्म कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

सरकार पक्षातर्फे मेघा पाटील यांनी काम पाहिले.

हेही वाचा: पाणीपुरवठ्यावर महापौरांची बैठक; गळती रोखणे, कमी दाबाच्या तक्रारींवर कारवाईचे निर्देश.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा