सांगली : जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एकूण १३ हजार ४७५ शेतकऱ्यांचे ४ हजार ७४.२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, या नुकसानीसाठी शासनाने ७ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपयांच्या मदतीस मान्यता दिली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन तत्पर असून बाधित शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले होते. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासनाने या निधीस मान्यता दिली आहे.
तसेच, ही मदत शेतकऱ्यांच्या कर्ज किंवा अन्य वसुलीत वळती करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना स्पष्ट निर्देश द्यावेत, असे आदेशही मंत्री जाधव-पाटील यांनी दिले आहेत.
हेही वाचा: प्रेयसीच्या वाढदिवसासाठी तरुणान केल असकाही, मित्रासह दोघे गजाआड.