सांगली : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी वाढ पाहायला मिळत असून, सांगलीत आजही सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम आहे. शनिवारी झालेल्या तीव्र दरवाढीनंतर रविवारीही सोन्या-चांदीचे दर उच्च स्तरावर नोंदवले गेले आहेत.
आज (दि. 28 डिसेंबर 2025) सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, सांगली बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price ) प्रति ग्रॅम 13,960 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 12,910 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. याशिवाय, चांदीचा दर प्रति ग्रॅम 245.50 रुपये इतका आहे. हे दर जीएसटी वगळून असून, बाजारानुसार त्यात बदल होऊ शकतो.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी, गुंतवणूकदारांचा कल आणि सण-उत्सवांचा हंगाम यांचा परिणाम सोन्या चांदीच्या दरांवर होत असल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. वाढत्या दरांमुळे दागिने खरेदीसाठी नागरिक सध्या सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
दरम्यान, सांगलीसह जिल्ह्यातील अनेक सराफ बाजारात ग्राहक दरवाढीबाबत माहिती घेत असून, आगामी दिवसांत दरात स्थिरता येते की आणखी वाढ होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगलीतील आजचा सोन्या-चांदीचा दर (28/12/2025)
सोन्याचा दर (प्रति ग्रॅम)
14 CT – ₹ 8,380
18 CT – ₹ 10,470
22 CT – ₹ 12,910
23 CT – ₹ 13,470
24 CT – ₹ 13,960
चांदीचा दर (प्रति ग्रॅम)
चांदी – ₹ 245.50
(वरील दर GST वगळून आहेत | अपडेट 11:50)
हेही वाचा: सांगलीतील येडेनिपाणीत झाडावरून खाली उतरताना दिसून आला बिबट्या; परिसरात भीतीचे वातावरण.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










