इस्लामपूर (सांगली): सांगली जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत रविवारी इस्लामपूर शहरात मोठी कारवाई झाली. इंदिरा कॉलनी परिसरात सुरू असलेल्या रमी क्लबवर पोलिसांनी छापा घालून तब्बल ४० ते ४५ जणांना ताब्यात घेतले. यात काही व्यापारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी असल्याचे समोर आले असून या कारवाईनंतर शहरात खळबळ माजली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या विशेष पथकाने ही धाड टाकली. दुपारपासून सुरू असलेल्या कारवाईत रमी खेळण्यासाठी जमलेल्या संशयितांकडून १५ दुचाकी व १ मोटार जप्त करण्यात आली. जुगारासाठी वापरलेले साहित्यही ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी नेमकी किती रोकड किंवा ऐवज हस्तगत झाला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र स्थानिक स्तरावर या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: जिल्ह्यावर पुन्हा पावसाचे संकट; या तारखेरदरम्यान सतर्कतेचा इशारा.