सांगली : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध कामगार कल्याण केंद्रांमध्ये कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमध्ये बॅडमिंटन, शिशुमंदिर तसेच शिवणवर्ग यांचा समावेश असून, केंद्रनिहाय वेळापत्रक व शुल्क जाहीर करण्यात आले आहे.
मंडळाच्या गट कार्यालयाअंतर्गत ललित कला भवन, सांगली, तासगांव, इस्लामपूर, मांजर्डे, कुंडल व माडगुळे येथील कामगार कल्याण केंद्रांमध्ये हे उपक्रम नियमितपणे चालवले जात आहेत. कामगारांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही या योजनांचा लाभ घेता येणार आहे.
ललित कला भवन, सांगली
वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली येथील ललित कला भवन येथे बॅडमिंटन उपक्रम सकाळी ६ ते १० तसेच सायंकाळी ४ ते ८.३० या वेळेत चालवला जात आहे. मासिक, सहामाही व वार्षिक अशा स्वरूपात प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले असून, कामगारांसाठी इतरांपेक्षा तुलनेने कमी शुल्क ठेवण्यात आले आहे.
तालुकानिहाय कामगार कल्याण केंद्रे
तासगांव, इस्लामपूर, मांजर्डे, कुंडल व माडगुळे येथील कामगार कल्याण केंद्रांमध्ये शिशुमंदिर (सकाळी ९.३० ते १.३०) आणि शिवणवर्ग (दुपारी १.३० ते ५.३०) हे उपक्रम चालवले जात आहेत. या उपक्रमांसाठी कामगार व इतर कुटुंबीयांसाठी स्वतंत्र शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
सदर उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक कामगारांनी संबंधित केंद्र संचालकांशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती घ्यावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – विभागीय कार्यालय, पुणे
दूरध्वनी : ०२०-२४२१९७०६
ई-मेल : mlwbcopune@gmail.com
सांगली केंद्र
केंद्र संचालक : श्री. संघसेन जगतकर – ८८५६८९१६६३
तासगांव केंद्र
केंद्र संचालक : श्री. महेश रसाळ – ९४२१०२८८९९
इस्लामपूर केंद्र
केंद्र संचालक : श्री. पियुष पाटील – ९४२३८१६९१०
मांजर्डे केंद्र
केंद्र संचालक : श्री. पियुष पाटील – ९४२३८१६९१०
कुंडल केंद्र
केंद्र संचालक : श्री. विकास पाटील – ९९६०६९४१००
माडगुळे केंद्र
केंद्र संचालक : श्री. विकास पाटील – ९९६०६९४१००
हेही वाचा: वालचंद कॉलेजच्या बी.टेक. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची HCL Tech मध्ये इंटर्नशिपसाठी निवड.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










