सांगली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद ते मारुती चौक दरम्यान ‘मेगा पदयात्रा’ काढण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांमुळे प्रमुख मार्गांवर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
जिल्हा परिषद येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. राम मंदिर चौक, स्टेशन चौक आणि राजवाडा चौक मार्गे ही पदयात्रा मारुती चौकापर्यंत पोहोचली. शेवटी मारुती चौकातील अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेची सांगता झाली.
विद्यार्थ्यांच्या मर्दानी खेळांचे आकर्षण
पदयात्रेपूर्वी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तलवारबाजी, लाठी-काठी, मल्लखांब आणि लेझीमच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी आणि ‘बाल शिवबा’–‘बाल जिजाऊ’ साकारणाऱ्या बालकांमुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांमधील विद्यार्थी, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: आजपासून रमजानला सुरुवात; सांगलीत मशिदींमध्ये गर्दी, ‘अजवा खजूर’ला मोठी मागणी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










