सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चा निकाल जाहीर करण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी, १६ जानेवारी २०२६ रोजी मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, ती पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात होणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहरातील एकूण ५२७ मतदान केंद्रांवरील मतमोजणी सहा निवडणूक निर्णय अधिकारी (RO-१ ते RO-६) यांच्या थेट नियंत्रणाखाली होणार आहे. प्रत्येक RO अंतर्गत १४ टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी केली जाणार असून, प्रभागांच्या विस्तारानुसार कमाल १० फेऱ्यांत संपूर्ण निकाल प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मतमोजणीची प्रत्यक्ष सुरुवात सकाळी १० वाजता होणार आहे. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक १, ३, ५, ९, १२ आणि १५ येथील मतदान केंद्रांची मोजणी सुरू होईल, त्यानंतर उर्वरित प्रभागांची मतमोजणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.
प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व उमेदवार आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी सकाळी ९ वाजता मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सुरक्षा कारणास्तव मतमोजणी हॉल व परिसरात मोबाईल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रण व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सर्व RO आपापल्या विभागातील प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवणार आहेत. सर्व ५२७ मतदान केंद्रांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर केला जाणार आहे.
हेही वाचा: मतमोजणीच्या दिवशी मिरज येथील सेंट्रल वेअरहाऊस परिसरात मनाई आदेश लागू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










